रेडिओच्या आठवणींना 'रेडिओवाणी'द्वारे उजाळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई : सध्या सोशल मीडियाचा बोलबाला असला, तरीही एक काळ रेडिओनेही गाजवला होता. रेडिओप्रेमी ते दिवस विसरले नाहीत. हाच सुवर्णमध्य लक्षात घेऊन एकेकाळी हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवलेल्या; परंतु दुर्लक्षित अशा संगीतकारांच्या सदाबहार गीत-संगीताचा नजराणा 'रेडिओवाणी' कार्यक्रमाद्वारे सादर होणार आहे.

मुंबईतील चार संगीतप्रेमींनी एकत्र येऊन हा कार्यक्रम तयार केला आहे. 

प्रदीप दळवी (गिटार वादक), रत्नाकर पिळणकर (संगीतकार), नंदकिशोर कदम (वास्तुरचनाकार), अशोक मुरकर (सेक्‍सोफोन वादक) हे कार्यक्रमाची निर्मिती करणारे रसिक आहेत. त्यांनी प्राण प्रोडक्‍शन ही संस्था स्थापन केली असून, जुनी गाणी ही नवनव्या संकल्पनांद्वारे रसिकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

'रेडिओवाणी'ची सुरुवात 4 डिसेंबरला रात्री 8 वाजता शिवाजी मंदिर येथे होणार आहे. संगीत संयोजक अशोक जाधव हे या कार्यक्रमाला संयोजन करणार आहेत. अपर्णा मयेकर, वैशाली फडके, संध्या राव, शुभदा वरेकर, नंदकिशोर कदम हे सुरेल आवाजात गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी रत्नाकर पिळणकर यांचे दिग्दर्शन आणि निवेदन आहे. 

Web Title: Artists to recall memories of Radio