महायुतीच्या प्रचारातून अरविंद सावंत गायब

मुंबई : महायुतीचे जाहिरात फलक.
मुंबई : महायुतीचे जाहिरात फलक.

मुंबई : राज्यात जोरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतून शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब आहेत. भाजपचे फलक किंवा जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र वापरले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

केंद्र आणि राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी घेतला. त्यानंतर संयुक्तपणे प्रचारही सुरू झाला. शिवसेनेकडून प्रचारातील फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे वापरली जातात. 

भाजपच्या फलकांवर केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच छायाचित्रांना स्थान दिले जाते. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. त्यांच्या क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांमधील भाजपचे उमेदवारही सावंत यांची छायाचित्रे वापरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

.........

मनोमीलन नाहीच? 
युती झाली असली, तरी शिवसेना-भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे सांगितले जाते. मतदानाला काही दिवस उरले असताना या दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहेत. वरून दोन्ही पक्ष एकत्र दिसत असले, तरी आत सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com