आर्यनची मृत्यूशी झुंज अयशस्वी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

डोंबिवली - बावन चाळ मैदानाजवळील रेल्वे यार्डात ओव्हरहेड वायरचा शॉक लागून 70 टक्के भाजलेल्या आर्यन महेश पटेल याची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. आर्यनला पुढील उपचारासाठी शुक्रवारी (ता. 11) ऐरोली येथे रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिथेच त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला. 

डोंबिवली-पश्‍चिमेकडील नवापाडा येथील आगरी सभागृहाजवळील त्रिवेणी व्हिला येथे राहणारा आर्यन गुरुवारी (ता. 10) मित्रांसह मोबाईल घेऊन रेल्वे यार्डात फोटो काढण्यासाठी गेला. यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीच्या टपावर जाऊन आर्यन सेल्फी काढत असताना शॉक लागल्याने तो मालगाडीवरून खाली पडला. जखमी झालेल्या आर्यनला नागरिक आणि रेल्वे पोलिसांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण, त्याची अवस्था गंभीर असल्याने त्याला ऐरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्याचा उपचारावेळी मृत्यू झाला. 

रेल्वे यार्डातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह? 

राजूनगर, बावन चाळ, गणेशनगर या परिसरातील तरुण मुले सर्रास या रेल्वे यार्डात फेरफटका मारतात. यार्डात शंटिंग होणाऱ्या गाड्यांमुळे अपघातांची भीती आहे. तसेच तरुणवर्गाची येथे उभ्या गाड्यांमध्ये चढून वेगवेगळ्या "ऍक्‍शन'मध्ये सेल्फी घेण्यास स्पर्धा सुरू असते. या दुर्घटनेनंतर रेल सुरक्षा बल खडबडून जागे झाले आहे. त्यांनी दोन दिवसांपासून या यार्डात सेल्फीसाठी फिरणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या पालकांना मुलांना सक्त ताकीद द्या आणि पुन्हा रेल्वे हद्दीत पाठवू नका; अन्यथा कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी देऊन सोडले. 

Web Title: Aryan death