गिरगावच्या आर्यन एज्यूकेशन सो.हायस्कूलचा प्रवेशोत्सव दिमाखात संपन्न

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 16 जून 2018

मुंबादेवी: - या बाळानो सारे या ll लवकर भरभर सारे या ll मजा करा रे मजा करा ll आज दिवस तुमचा समजा ll ओसांडून वाहु दया आनंदाचा झरा ll अशा सुंदर आणि प्रसन्न,आनंदाची उधळण करणाऱ्या फ़ळयावरील कवितेच्या या ओळी विद्यार्थी आणि उपस्थित पालकांच्या मनाला हर्षाच्या सुखद धक्का देत होत्या.

मुंबादेवी: - या बाळानो सारे या ll लवकर भरभर सारे या ll मजा करा रे मजा करा ll आज दिवस तुमचा समजा ll ओसांडून वाहु दया आनंदाचा झरा ll अशा सुंदर आणि प्रसन्न,आनंदाची उधळण करणाऱ्या फ़ळयावरील कवितेच्या या ओळी विद्यार्थी आणि उपस्थित पालकांच्या मनाला हर्षाच्या सुखद धक्का देत होत्या. आपली मुले आज दिमाखात शाळेच्या कड़क गणवेशात " प्रवेशोत्सवाचा आंनद साजरा करताना पाहुन आपल्याही बालपणी आजच्या सारखा प्रवेशोत्सव असायला हवा होता, हे मनात आल्याने पालकांना मुलांच्या आनंदाचा हेवा वाटत होता.याचे कारणही आज खासच  होते, सकाळ माध्यमाने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी आम्ही गिरगावकर ग्रुप तर्फे सकाळी शाळा प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत त्यांच्या वर्तमान आणि भविष्य कालीन शैक्षणिक प्रगतीचा आलेख ऊँचवावा म्हणून गुलाब पुष्प,सकाळ अंक आणि शैक्षणिक साहित्य देत स्वागतपर शुभेच्छा दिल्या.शाळेचा आज पहिला दिवस मुलांच्या कीलबिलिटाने,गोंगाटाने चांगलाच गाजला.विद्यार्थ्यांच्या स्वागता करिता आज शाळा सुंदर सजविन्यात आली होती.

शाळेचे अध्यक्ष आमोद उसपकर, मुख्याध्यापक बी.एन.गावीत,शिक्षक वृंद तसेच 'आम्ही गिरगावकर' संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर, संतोष चौरसिया,सुंदर सूबैय्या, हितेंद्र अग्रवाल,जयद देसाई यांनी प्रवेशोत्सवास विशेष सहकार्य केले.प्रत्येक विद्यार्थ्यांस आणि विद्यार्थीनीस गुलाब पुष्प,पेढा आणि शैक्षणिक साहित्य देत स्वागत करणाऱ्या शिक्षकांच्या नजरेतील विलक्षण आनंद उठून दिसत होता. तर नवीनच शाळा, नवीन वर्ग आणि शिक्षक यांची धास्ती घेतलेली चिमुरडी जरा बिचकत शाळेत जात होती. काही मुलांनी तर चक़्क़ रडत रडत टाहो फोड़ला,तर काही विद्यार्थी जोरजोरात हसत शाळेत प्रवेश करीत होते.एक मात्र खरे की आजचा दिवस या 'बाळानी जाम मज़्ज़ा करीत आनंदोत्सवात साजरा केला याचे अप्रूप साऱ्या पालकांना होते.विद्यार्थ्यांनी सकाळ चा अंक ऊँचावत पुनःश्च सकाळ तर्फे 

विद्यार्थ्यासाठी वर्षभर आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धा,  चित्रकला स्पर्धा,स्कोलरशीप,ग्रुप लीडर आदी स्पर्धा कधी पासून सुरु होतील यांची उत्सुकता लागल्याचे मागील वर्षीय 5 वी च्या तुकडीतील उत्तिर्ण  विद्यार्थ्यांनी सकाळ प्रतिनिधी कड़े आवर्जून विचारणा केली.

सकाळ माध्यमाचा स्तुत्य उपक्रम: सकाळ माध्यम विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीचा आलेख वाढ़ावा आणि त्यांची बौद्धिक ज्ञानसंपदा वृद्धिंगत व्हावी म्हणून वर्षभर विविध शैक्षणिक उपक्रम राबवित असतात.त्याचा मुलांच्या वैयक्तिक विकासात्मक दृष्टीने उत्तम लाभ होतो.तसेच मुलांच्या अंगी असलेली नैसर्गिक नेतृत्व  क्षमता आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्याचे धाडस,सामर्थ्य त्यांना शाळेतुनच प्राप्त होते असे म्हणत शाळेचे अध्यक्ष आमोद उसपकर यांनी सकाळ च्या उपक्रमाचे खास कौतुक केले.

Web Title: Aryan Education So of Girgaon school firs day