Aryan Khan : आर्यन प्रकरणात मुख्य आरोपी केपी गोसावीच; प्रभाकर साईलच्या वकिलांची माहिती, तर... | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan and KP Gosavi

Aryan Khan : आर्यन प्रकरणात मुख्य आरोपी केपी गोसावीच; प्रभाकर साईलच्या वकिलांची माहिती, तर...

मुंबई : आर्यन खान प्रकरणात सध्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई केल्यानंतर परत एकदा क्रुझ ड्रग्स प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर एनसीबीच्या पंचनाम्यात प्रभाकर साईल याने पंच म्हणून स्वाक्षरी केली होती. काही दिवसात साईलने यू टर्न घेत, या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले.

साईल हा के पी गोसावी याचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर होता. परंतु या प्रकरणाचा 'व्हीसलब्लोअर ' प्रभाकर साईल ठरला. प्रभाकरचे वकील असलेले ऍड हेमंत इंगळे यांच्या मतानुसार या प्रकरणात गोसावी हा मुख्य आरोपी होता. या पूर्ण प्रकरणात प्रभाकर साईल याचा रोल फक्त गोसावी चा ड्रायव्हर एवढाच मर्यादित असल्याचे ऍड. हेमंत इंगळे सांगतात. या संदर्भात एड इंगळे यांनी सकाळ प्रतिनिधीशी बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली.

के पी गोसावी मुख्य आरोपी

क्रुझवर कारवाई केल्यानंतर आर्यन खानला एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. तेथे प्रभाकर साईन याला आर्यन खान प्रकरणात पंच बनवण्यात आले होते. परंतु पंचनामा करण्याआधीच साईलची कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली.

या पूर्ण प्रकरणात प्रभाकर साईल याचा रोल फक्त गोसावी चा ड्रायव्हर एवढाच मर्यादित होता. प्रभाकर आणि वानखेडे यांच्या थेट संपर्क नव्हता . परंतु वानखेडे आणि गोसावी यांच्या कनेक्शन होते. तसेच प्रभाकर गोसावी याच्या निर्देशात काम करत होतो. या पूर्ण प्रकरणात के पी गोसावी हा मुख्य आरोपी आहे. त्यानंतर मग समिर वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांवर आरोप करता येऊ शकतात.

आर्थिक वाद

गोसावी याचा ड्रायव्हर असलेल्या प्रभाकर साईल यांच्यात आर्थिक वाद झाला होता. गोसावी आणि प्रभाकर यांच्यात ठरलेला पैशाचा व्यवहार गोसावीने पूर्ण केला नाही. परिणामी प्रभाकर साईलने या पूर्ण घटनेबद्दल माहिती उघड केली. त्यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी एनसीबी ची विशेष टीम दिल्लीहून मुंबईत दाखल झाली.

या विशेष पथकासमोर प्रभाकर साहिल यांनी आपला जबाब नोंदवला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुद्धा तपास केला होता. मुंबई पोलिसांनी प्रभाकर साहिल याचा जबाब नोंदवलेला होता. प्रभाकर साईलचा जवाब हा या प्रकरणात एनसीबी पथकाने केलेल्या तपासात मुख्य पुरावा ठरला.

अकस्मात मृत्यू ....

या प्रकरणात तपास कालांतराने थंडावला. प्रभाकर आपलं रोजचं आयुष्य जगत होता या प्रकरणानंतर पोलिसांकडून कोणतीही सुरक्षा त्याला देण्यात आलेली नव्हती. याच काळात मार्च 2022 ला प्रभाकर साईलला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू बाबतही सुरुवातीला संशय व्यक्त केला गेला होता. पोलीस तपासही झाला. परंतु त्यात काही संशयास्पद सापडलं नाही. प्रभाकर साईल हा विवाहित असून त्याला एक मुलगी सुद्धा आहे. आयुष्याच्या काही काळ प्रभाकर कौटुंबिक जीवनात रमला. परंतु त्यानंतर तो आपल्या पती आणि मुलगी पासून वेगळा विभक्त एकटा राहू लागला

"या प्रकरणात प्रभाकर साईल याचा रोल फक्त गोसावी चा ड्रायव्हर एवढाच मर्यादित होता. प्रभाकर आणि वानखेडे यांच्या थेट संपर्क नव्हता . परंतु वानखेडे आणि गोसावी यांच्या कनेक्शन होते.तसेच प्रभाकर गोसावी याच्या निर्देशात काम करत होतो. या पूर्ण प्रकरणात के पी गोसावी हा मुख्य आरोपी आहे. त्यानंतर मग समिर वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांवर आरोप करता येऊ शकतात."

- ऍड. हेमंत इंगळे, प्रभाकर साईलचे तत्कालीन वकील