आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार

आषाढी एकादशीनिमित्य पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने अगोदरच शंभर पंढरपूर विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा
Ashadi wari 2022 Central Railway special trains on occasion of Ashadi Ekadashi Jalna nanded Aurangabad to Pandharpur mumbai
Ashadi wari 2022 Central Railway special trains on occasion of Ashadi Ekadashi Jalna nanded Aurangabad to Pandharpur mumbai sakal

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्य पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेने अगोदरच शंभर पंढरपूर विशेष रेल्वे गाड्या चालविण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने जालना - पंढरपूर, नांदेड - पंढरपूर आणि औरंगाबाद - पंढरपूर दरम्यान आणखी चार अतिरिक्त एकादशी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जालना - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07468 जालना - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस जालना येथून ९ जुलै २०२२ रोजी रात्री ७.२० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 07469 आषाढी विशेष एक्स्प्रेस पंढरपूर येथून १० जुलै २०२२ रोजी रात्री ८.३० वाजता सुटेल आणि जालना येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता पोहोचेल.

नांदेड - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड येथून ९ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 07499 विशेष पंढरपूर येथून १० जुलै २०२२ रोजी रात्री ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.४५ वाजता नांदेडला पोहोचेल.

औरंगाबाद - पंढरपूर विशेष एक्स्प्रेस

गाडी क्रमांक 07515 विशेष औरंगाबाद ९ जुलै २०२२ रोजी रात्री ९.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 07516 विशेष पंढरपूर येथून १० जुलै २०२२ रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि औरंगाबाद येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२० वाजता पोहोचेल.

भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष

गाडी क्रमांक 01123 विशेष गाडी भुसावळ येथून ९ जुलै २०२२ रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री ०३.३० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01130 विशेष पंढरपूर येथून १० जुलै २०२२ रोजी रात्री ११. ३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com