भाजप सरकार नपुंसक व वांझोटे - आशिष देशमुख

Ashish-Deshmukh
Ashish-Deshmukh
मुंबई - सत्ताधारी भाजपमधून आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या आशिष देशमुख यांनी आज सरकारवर पुन्हा आक्रमक टीकास्त्र सोडले. या सरकारमध्ये कोणताही वर्ग, व्यापारी, शेतकरी, महिला, बेरोजगार युवा समाधानी नसून, हे सरकार नपुंसक व वांझोटे असल्याची टीका त्यांनी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या सरकारला घालवण्यासाठी भाजपच्याच आमदारांना पत्र लिहिणार असल्याचे देशमुख म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजपला अनेक हादरे बसतील. पक्षातील नाराज निर्णायक होतील, असा इशारा देशमुख यांनी या वेळी दिला. नाराजांच्या भीतीनेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com