भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांच्या उलट्या बोंबा - शेलार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - आघाडी सरकारच्या काळात भूखंडाचे श्रीखंड ज्यांनी खाल्ले त्यांच्याच उलट्या बोंबा सुरू आहेत, अशा शब्दांत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर आज पलटवार केला. भ्रष्टाचाराची माहिती लपविल्याप्रकरणी नवाब मलिक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी पोलिस आयुक्तांकडे केली. नवाब मलिक यांनी आरोप केलेल्या भूखंडाचे आरक्षण आघाडी सरकारच्या कालावधीत बदलण्यात आले. या आरक्षण बदलाशी भाजपचा अथवा वैयक्तिक माझा संबंध नाही, असेही आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
Web Title: ashish shelar comment on ncp