भाजपच्या स्टार प्रचारकांतून आशिष शेलार गायब

प्रशांत बारसिंग : सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असताना भारतीय जनता पक्षाच्या "कारभारा'चा मजेशीर नमुना समोर आला आहे. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका जिंकायचा भाजपने संकल्प सोडला त्या ऍड. आशिष शेलार यांचेच नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून गायब झाले असून, हा प्रकार नजरचुकीने झाला की जाणीवपूर्वक करण्यात आला, याबाबत भाजपमध्येच उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

निवडणुकीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या खर्चासाठी सर्व राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाते. यादीत नाव असलेल्या नेत्याने प्रचार केल्यास त्या सभेचा खर्च पक्षाच्या खात्यात ग्राह्य धरला जातो, मात्र यादीत नाव नसलेल्या नेत्याने प्रचार केल्यास संबंधित खर्च उमेदवाराच्या खर्चात धरण्यात येतो. यापूर्वी स्टार प्रचारकांची संख्या कमी होती. मात्र यात वाढ करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि मान्यताप्राप्त पक्षांसाठी जास्तीत जास्त 40 नेत्यांची नावे देण्याबाबत निवडणूक आयोगाने 21 जानेवारी रोजी आदेश काढले होते. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टीने 40 नेत्यांच्या नावांची यादी 23 जानेवारी रोजी आयोगाकडे सादर केली. भाजपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्री, तर तिसऱ्या क्रमांकावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. त्यानंतर केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, आमदार-खासदार यांची नावे आहेत. मात्र आशिष शेलार व किरीट सोमय्या यांच्या नावांना फाटा देण्यात आला.

Web Title: Ashish Shelar removed from BJP election campaign