"महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?" आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

सुमित बागुल
Saturday, 21 November 2020

राज्यातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलंय. महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?  म्हणत माजी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढलेत.

आशिष शेलार यांनी आज एक खरमरीत ट्विट करत ठाकरे सरकारमधील शिक्षण विषयक विभागातील त्रुटींचा पाढाच वाचून दाखवलाय. परिक्षा घेण्यावरुननिर्माण झालेला संभ्रम, त्यानंतर परिक्षा घेतल्या त्यात पालक विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप, अँडमिशवरुन निर्माण झालेला गोंधळ, शाळांची फी वाढीबाबत हतबलता, अभ्यासक्रमाबाबतही असलेलं प्रश्नचिन्ह आणि शाळा सुरू करण्याबाबतच्या गोंधळाबाबत आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केलेत. या या प्रश्नांच्या शेवटी आशिष शेलार यांनी महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? असा प्रश्न पडल्याचं म्हटलंय. 

महत्त्वाची बातमी : उद्धव ठाकरेंनी घेतली महत्त्वाची बैठक; शिवसेनेनेही फुंकलं २०२२ मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग

महत्त्वाची बातमी :  1 हजार 887 कोटी रुपयांच्या तुटीच्या अर्थसंकल्पास बेस्ट समितीत मंजूरी, तांत्रिक वाद निर्माण होण्याची  शक्यता

राज्यात शालेय शिक्षण विभागाकडून दिवाळीनंतर म्हणजेच २३ नोव्हेंबरला शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काल मुंबईमध्ये आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील असा निर्णय घोषित केला. ठाण्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला. अशात शालेय शिक्षण मंत्र्यांनी म्हणजेच वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना दिल्यात. या मुद्द्यांवरून आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जहरी टीका केलीये. 

ashish shelar tweets to target thackeray government over starting schools in state

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashish shelar tweets to target thackeray government over starting schools in state