लढवय्या ‘पँथर’ काळाच्या पडद्याआड! : अशोक चव्हाण

Rajadhale
Rajadhale

मुंबई : दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, दलित पँथरचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांच्या निधनामुळे अन्यायग्रस्तांसाठी संघर्ष करणारा लढवय्या ‘पँथर’ काळाच्या पडद्याआड गेल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

ढाले यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ते एक लढवय्ये नेते होते. आयुष्यभर त्यांनी अन्यायाविरोधात संघर्ष केला. आक्रमक बाणा, परखड विचार आणि विचारधारेवर असलेल्या प्रगाढ विश्वासामुळे ते एक अतिशय लोकप्रिय नेते व लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते.

सामाजिक चळवळीसोबतच साहित्य क्षेत्रातही राजा ढाले यांचे मोठे योगदान होते. ते एक उत्तम साहित्यिक, व्यासंगी अभ्यासक आणि फर्डे वक्ते होते. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची प्रचंड हानी झाली असून, ते कायम लाखो कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहतील, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी राजा ढाले यांना श्रद्धांजली  अर्पण केली.

राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र  दुःख व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार ;मार्गदर्शक; दलित पँथर चा महानायक हरपला आहे अशी शोकभवना व्यक्त करून ना रामदास आठवले यांनी दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com