मोखाड्यात आश्रमशाळा बांधकाम घोटाळा

भगवान खैरनार
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

मोखाड्यातील सुर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या निकृष्ट बांधकाम आणि विलंबाबाबत विधानपरिषद आणि विधानसभेत तारांकित आणि अतारांकीत प्रश्न ऊपस्थित करण्यात आले होते. त्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी अपुर्ण काम असतांना तसेच सर्वच अलबेल असल्याचे खोटे उत्तर सादर केले आहे. तर या कामाचा तपासणी अहवाल, आदिवासी विकास विभागापासुन दडवून ठेवला आहे. निम्मा निधी भौगोलिक परिस्थितीचे कारण देत, जमीन सपाटीकरणावरच दाखवण्यात आला आहे.

मोखाडा- मोखाड्यातील सुर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या निकृष्ट बांधकाम आणि विलंबाबाबत विधानपरिषद आणि विधानसभेत तारांकित आणि अतारांकीत प्रश्न ऊपस्थित करण्यात आले होते. त्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी अपुर्ण काम असतांना तसेच सर्वच अलबेल असल्याचे खोटे उत्तर सादर केले आहे. तर या कामाचा तपासणी अहवाल, आदिवासी विकास विभागापासुन दडवून ठेवला आहे. निम्मा निधी भौगोलिक परिस्थितीचे कारण देत, जमीन सपाटीकरणावरच दाखवण्यात आला आहे.

सुर्यमाळ आश्रमशाळा संकुलाच्या बांधकामाच्या विलंबाबाबत बाबत विधानपरिषदेत ऊपस्थित करण्यात आला होता. त्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जव्हार विभागीय कार्यालयाने 8 डिसेंबर 2017 ला बांधकामाच्या विलंबाबाबत अंशतः खरे असल्याचे सांगत निकृष्ट बांधकामाबाबत या कामाची दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडून तांत्रिक तपासणी केल्याचे ऊत्तर दिले आहे. तर कंत्राटदारास कामाची मुदत संपल्याने प्रतिदिन एक हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे ऊत्तर दिले आहे. 20  फेब्रुवारी  2018  ला सुर्यमाळ आश्रमशाळेतील विद्यार्थी सध्यस्थितीत रहात असलेले जुने शेड सुस्थितीत असल्याचे तसेच पळसुंडा नवीन संकुलाचे केवळ ईलेक्ट्रिकलची कामे प्रगतीपथावर असल्याचे ऊत्तर पाठविण्यात आले.

विधानसभेत पुन्हा हाच प्रश्न ऊपस्थित करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र, सुर्यमाळ आश्रमशाळेच्या सद्यस्थितीत विध्याथीॅ रहात असलेले सर्व जुन्या शेडला गळती लागली असल्याची विदारक स्थिती आहे. येथील, विद्यार्थी जनावरांच्या गोठ्याप्रमाणे येथे रहात असल्याचे वास्तव सकाळनेच चव्हाटय़ावर आणले आहे. तर पळसुंडा संकुलाच्या ईमारतीचे बांधकाम आजही अपुर्णावस्थेत झालेले आहे. येथील, ईमारतीचे प्लास्टर, दरवाजे, खिडक्या, फरशीसह ईलेक्ट्रिकलचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने विधानमंडळाला खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे.

निकृष्ट बांधकाम पाडण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
सुर्यमाळ येथील नवीन शाळा तसेच वसतिगृहाच्या ईमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने, ते बांधकाम खात्याने न पाडल्यास सुर्यमाळचे ग्रामस्थ पाडणार आहेत. हा बांधकाम घोटाळा शाखा अभियंता, ऊपअभियंता, कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांनी संगनमताने केल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

Web Title: Ashramshala building scam in Mokhada