आश्रमशाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचा पगार देणार नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

मुंबई - आदिवासी विभागाच्या अखत्यारीतील मान्यता रद्द झालेल्या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने या शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत पगार न देण्याचा निर्णय आदिवासी विभागाने शनिवारी घेतला. या संदर्भात अध्यादेश जारी करून काम नसल्याने वेतन देता येत नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील आदिवासी पाड्यांवर स्वयंसेवी संस्था शाळा चालवतात. या शाळांना सरकार अनुदान देते. तेथील विद्यार्थी कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांना काम नसल्याने पगारही न देण्याचा निर्णय शनिवारी आदिवासी विभागाने घेतला. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत या शिक्षकांना पगार मिळणार नाही. या निर्णयाला शिक्षकांनी कडाडून विरोध केला आहे.

Web Title: ashramshala teacher do not give extra salary