अष्टमीत पुरामुळे रस्ते उखडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुंबई : मुसळधार पावसामुळे रोहा येथील कुंडलिका नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने अष्टमीत पूरपरिस्थिती निर्माण झाली. अष्टमीच्या मागील बाजूने वाहणाऱ्या मोठ्या प्रवाहाने रस्ते उखडले असून रस्त्यांचा काही भाग खचला आहे. रोहा-नागोठणे मार्गावरील मोरी धोकादायक झाली आहे. 

शहरातील अष्टमी येथील कोळीवाडा, सुर्वे आळी, मुकुंदनगर, रेल्वे वसाहत आदी ठिकाणी घरात पाणी शिरले. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्यासह विविध घरगुती वस्तूंचे नुकसान झाले. अनेकांच्या वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अष्टमीच्या मागील बाजूस मोठ्या प्रवाहाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्याने रस्ता ठिकठिकाणी उखडला. रोहा-नागोठणे मार्गावरील मोरीचा काही भाग कोसळल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. 

सलग दोन दिवस पूर असल्याने अष्टमीजवळील गावांत राहणारे नागरिक, रोहा रेल्वेस्थानकावर ये-जा करणारे नागरिक यांना कंबरभर पाण्यातून मार्गक्रमण करावे लागले. रेल्वे वाहतूक विस्कळित झाल्याने पावसात अडकलेल्या ६०० प्रवाशांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी बसेस उपलब्ध करून दिल्या. दरम्यान, सुराज्य संस्था, रोटरी क्‍लब व स्वराज्य फाऊंडेशनच्या सेवाभावी तरुणांनी सर्व प्रवाशांना मदत करत रोहा एसटी स्टॅंडवर पोहोचवले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashtmeet floods ruin roads

टॅग्स