अश्‍विनी बिंद्रे खुन प्रकरण; पतीची न्यायालयात रिट याचिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि अश्विनीचे बंधू आनंद बिद्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेव्यतिरिक्त अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा. तसेच या तपासाचे नियंत्रण सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि अश्विनीचे बंधू आनंद बिद्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या २९ जुलै रोजी न्या. रणजित मोरे यांच्या न्यायालयात होणार आहे.

सध्या अलिबाग न्यायालयात अश्विनी बिद्रे प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे; मात्र ज्या पोलिस कर्मचाऱ्यांना या प्रकरणाची माहिती नाही, असे पोलिस कर्मचारी सुनावणीसाठी उपस्थित राहात असल्याची तक्रार अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केली. या प्रकरणाची इत्यंभूत माहिती एसीपी संगीता शिंदे-अल्फान्सो यांना असल्यामुळे त्याच योग्य दिशेने तपास करू शकतात. त्यामुळे या खटल्याचे कामकाज संपेपर्यंत त्यांच्या नियंत्रणाखाली या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी राजू गोरे यांनी रिट याचिकेद्वारे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashwini bendre murder issue, writ submitted by husband