मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापाकीय संचालकपदावरून अश्विनी भिडे यांची उचलबांगडी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

मुंबई - बातमी मुंबई मेट्रो आणि त्यांच्या संचालकांच्या बदलीच्या बाबतीतील. मुंबई मेट्रो प्राधिकरणाच्या संचालकपदी आता रणजितसिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे यांच्याकडे ही जबाबदारी या आगोदर होती. मात्र आता त्यांच्याजागी रणजितसिंह देओल यांच्याकडे ही सूत्र गेल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे सरकारकडून मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात  येतायत. अशात आता अश्विनी भिडे यांच्याबदली रणजितसिंह देओल यांची वर्णी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापाकीय संचालकपदी  लागली आहे. 

मोठी बातमी : मुंबई पोलिसांनीच त्यांना वर्सोवाच्या फ्लॅटवर पाठवलं आणि...

अश्विनी भिडे यांच्यावर आरे कारशेड मधील वृक्षकत्तलीवरून  अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर त्या आक्रमकपणे उत्तरं देताना देखील पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या खेपेत एकूण २० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अश्विनी भिडे यांचं देखील नाव समोर आलं आहे. त्यांच्यासोबतच तुकाराम मुंढे यांची बदली नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. 

मोठी बातमी :  मला 'नाईट लाईफ' हे शब्दच आवडत नाही - उद्धव ठाकरे

दरम्यान अश्विनी भिडे यांना आता कोणती जबाबदारी देण्यात येईल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा याबाबत माहिती घेतली जाणार आहे. तोपर्यंत अश्विनी भिडे यांचं नाव वेटिंगवर ठेवण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.     

ashwini bhide is removed from the post of MD of mumbai metro ranajitsing deol will be new MD

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ashwini bhide is removed from the post of MD of mumbai metro ranajitsingh deol will be new MD