बिद्रेच्या मृतदेहाचा आज शोध घेणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिस मंगळवारपासून मॅग्नेटोमीटरच्या सहायाने शोध घेणार आहेत. त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी ओशियन सायन्स अँड सर्व्हायविंग प्रा. लि. या खासगी कंपनीने गत आठवड्यात भाईंदरच्या खाडीत राबविलेल्या शोध मोहिमेनंतर लोखंडसदृश वस्तू आढळून आलेली नऊ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. या नऊ ठिकाणांपैकी सर्वप्रथम महत्त्वाच्या दोन ठिकाणी मॅग्नेटोमीटरच्या सहायाने आता शोध घेण्यात येणार आहे. या शोध मोहिमेवर नवी मुंबई पोलिसांचा पुढील तपास अवलंबून राहणार आहे. मृतदेहाचा शोध घेणाऱ्या संबंधित कंपनीने यापूर्वी मॅग्नेटोमीटर इराकहून आणण्याचे निश्‍चित केले होते; मात्र सदर उपकरण हे भारतातील एका कंपनीकडे उपलब्ध झाल्याने मॅग्नेटोमीटर इराकहून आणण्याचा नवी मुंबई पोलिसांचा त्रास वाचला आहे.
Web Title: ashwini bidre deathbody searching