खाडीतील शोधमोहीम तूर्त स्थगित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेत दुसऱ्या दिवशीही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

नवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेत दुसऱ्या दिवशीही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

त्यामुळे पोलिसांनी तूर्त भाईंदर खाडीतील शोधमोहीम थांबविली आहे; मात्र ही शोधमोहीम पुन्हा नव्या पद्धतीने सुरू करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ही शोधमोहीम कधी सुरू होणार, याबाबत स्पष्टता केलेली नाही.

Web Title: ashwini bidre murder case searching stop