शोध मोहिमेसाठी खासगी कंपन्यांची मदत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नवी मुंबई - पोलिस अधिकारी अश्‍विनी गोरे-बिंद्रे खून प्रकरणात त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी दोन खासगी कंपन्यांची मदत घेण्याचा निर्णय नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार बुधवारी दुपारपासून या कंपन्यांच्या पाणबुड्यांनी वसई खाडीत पुन्हा पाण्याखाली शोध मोहीम राबवली. आणखी दोन दिवस ही शोधमोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

आरोपी अभय कुरुंदकरने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अश्‍विनी गोरे हिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह टाकून दिलेल्या वसई खाडीत पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू झाली आहे. यासाठी पोलिसांनी दुन्निमा इंजिनियर्स व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिओनग्राफी या कंपन्यांची मदत घेतली. या कंपन्यांकडे असलेल्या अद्ययावत साहित्य व उपकरणांच्या मदतीने अश्‍विनीच्या मृतदेहाचा पाण्याखाली शोध घेतला जाणार आहे.

Web Title: Ashwini Gore - Bindre murder case