शंभर कोटींच्या निधीची विधानसभेत मागणी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

वसंतदादा पाटील जन्मशताब्दी वर्ष; मुख्यमंत्र्याचा कृतज्ञता प्रस्ताव
मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री थोर स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याकरिता राज्य सरकारने 100 कोटींचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार आणि कॉंग्रेसचे आमदार पतंगराव कदम यांनी बुधवारी विधानसभेत केली.

यानिमित्त राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसंतदादांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून नवीन पिढीला दिशा मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करावे, असेही पवार यांनी सुचविले.

वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख व्हावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृतज्ञता प्रस्ताव सभागृहात मांडला होता. फडणवीस म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी शिक्षणाचे खासगीकरण केले ही संकल्पना चांगली होती. दादांनी ही योजना तयार करताना जो विचार केला, तो विचार म्हणजे तीस टक्के विद्यार्थ्यांना जादा शुल्क मोजावे लागतील; मात्र, त्या तीस टक्के विद्यार्थ्यांच्या शुल्कातून उर्वरित 70 टक्के विद्यार्थ्यांचा खर्च निघेल. मात्र, कालांतराने शिक्षण व्यवस्था संस्थाचालकांच्या भोवती केंद्रित झाली. त्यामुळे शिक्षणाचे व्यावसायीकरण होऊ नये, याकरिता काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. हा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला सभागृहातील उपस्थित सदस्यांनी पाठिंबा देत दादांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या प्रस्तावावर मुख्यमंत्री फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पतंगराव कदम, गणपतराव देशमुख, एकनाथ शिंदे यांनी विचार व्यक्त केले. दादांची शताब्दी साजरी करताना "पाणी अडवा, पाणी जिरवा', असे कार्यक्रम राबवा, अशी सूचनाही गणपतराव देशमुख यांनी केली.

Web Title: Assembly demanding a hundred million of funds