म्युच्युअल फंड उद्योगात "असेट ऍलोकेशन फंडां' ची आघाडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

विविध प्रकारच्या मालमत्तांमधील गुंतवणुकीचे मिश्रण असलेल्या असेट अलोकेशन फंडांच्या निवडक योजना भांडवली बाजाराच्या चढउताराच्या पार्श्‍वभूमीवर चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई : विविध प्रकारच्या मालमत्तांमधील गुंतवणुकीचे मिश्रण असलेल्या असेट अलोकेशन फंडांच्या निवडक योजना भांडवली बाजाराच्या चढउताराच्या पार्श्‍वभूमीवर चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून आले आहे. तीन, पाच आणि दहा वर्षांच्या कालावधीत असेट ऍलोकेश फंडांनी गुंतवणूकदारांना समाधानकारक परतावा दिला आहे. 

देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींचे परिणाम भांडवली बाजारावर होत असून निर्देशांकात मोठी उलाथापालथ होत आहे. मात्र अशा स्थितीत असेट ऍलोकेशन फंडात सातत्यपूर्ण गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडांने तारले आहे. असेट ऍलोकेशन फंडांच्या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडांने गेल्या 10 वर्षांत कामगिरीत सातत्य ठेवल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. सेबीच्या मल्टी ऍलोकेशन श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेंशिअल मल्टी असेट फंडाने तीन वर्षात 8.36 टक्के आणि 10 वर्षात 11.99 टक्के परतावा दिला.

कंजरर्व्हेटीव्ह हायब्रीड फंडांच्या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेंशिअल रेग्युलर सेव्हींग फंडाने पाच वर्षाकरिता 9.58 टक्के आणि 3 वर्षात 7.87 टक्के परतावा दिला आहे. ऍग्रेसीव्ह फंडांच्या श्रेणीत इक्विटी आणि डेट फंडाने पाच वर्षात 9.96 टक्के आणि 10 वर्षात 13.07 टक्के परतावा दिला आहे. आयसीआयसीआय प्रुडेंशिअल बॅलन्स ऍडव्हान्स फंडांची एकूण मालमत्ता सप्टेंबर 2019 अखेर 27 हजार 856 कोटी आहे. सहा वर्षात फंड व्यवस्थापनाखालील मालमत्तेत 57 पटीने वाढ झाली. फेब्रुवारी 2019 मध्ये सादर करण्यात आलेल्या असेट ऍलोकेशन फंडाकडे 3 हजार 659 कोटींची गुंतवणूक आहे. 

डेट आणि इक्विटी बाजारातील दांडगा अनुभव असलेल्या फंड व्यवस्थापकांकडून असेट अलोकेशन फंडाचे व्यवस्थापन केले जात असल्याने गुंतवणूक योजनांमध्ये सातत्य दिसून आले आहे. 

web title : "Asset Allocation Funds" Leading in the Mutual Fund Industry


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Asset Allocation Funds" Leading in the Mutual Fund Industry