नव्या वर्षात मिळणार मालमत्ता देयके

नव्या वर्षात मिळणार मालमत्ता देयके

पनवेल : पलिकेतील महत्त्वपूर्ण उत्पन्नांच्या स्रोतांपैकी मालमत्ता कराची लवकरच वसुली केली जाणार आहे. नव्या वर्षातील मे महिन्यापासून नागरिकांच्या प्रत्यक्ष हातात मालमत्ता कराची देयके पडण्याची शक्‍यता मालमत्ता कर विभागातर्फे वर्तवली जात आहे. सध्या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मालमत्ता कर विभागातून देण्यात आली. 

पनवेल महापालिका नव्याने स्थापन झाल्यामुळे सध्या मालमत्ता कर विभागातर्फे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. स्थापत्य कन्सल्टन्ट या खासगी कंपनीद्वारे तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून मालमत्तांचे लिडार पद्धतीने सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणात तीन लाख मालमत्तांची महापालिकेकडे नोंद झाली आहे. 
सध्या पनवेल शहर व काही गावांमधील नागरिक पालिकेचा कर भरतात. नवीन पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर, तळोजा व नावडे या वसाहतींमधील नागरिक सिडकोकडे सेवाशुल्क भरत आहेत.

पालिकेच्या मालमत्ता कर धोरणामुळे आता हे सर्व नोड महापालिकेत समाविष्ट झाल्याने पालिकेला मालमत्ता कर मिळणार आहे. या मालमत्ता करापोटी पालिकेला तब्बल ३०० कोटी रुपयांचे कर मिळणार आहे. पालिकेतर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणात काही मालमत्ताधारकांनी आक्षेप नोंदवल्यामुळे अखेरच्या वेळी त्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण संपल्यानंतर तात्काळ मालमत्ता कर विभागातर्फे कर संकलनाच्या नोटिसा मालमत्ताधारकांना बजावल्या जाणार आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com