अटलजींच्या कविता आता ब्रेल लिपीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई - भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर हजारो कार्यक्रम झाले; पण मुंबईत होणारा हा कार्यक्रम वेगळा आहे.

मुंबई - भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर हजारो कार्यक्रम झाले; पण मुंबईत होणारा हा कार्यक्रम वेगळा आहे.

अटलजी हा कार्यक्रम बघत असते, तर अत्यंत आनंदी झाले असते. ब्रेल लिपीत आलेल्या अटलजींच्या कविता आता "देवाच्या लेकरां'पर्यंत पोचतील, अशी भावना केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली. वाजपेयी यांच्या "अटल विश्‍वास' या कवितासंग्रहाच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते नुकतेच झाले. या पुस्तकाचे संपादन ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी केले आहे.

Web Title: atal bihari bajpai poem in brail lipi