एटीएममधून पैसे काढले अन्‌ फसला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - वांद्रे येथील इमारतीच्या बांधकाम साइटवरील सुपरवायझरच्या हत्येप्रकरणी शादाब हसरत तन्वीर अहमद अन्सारी ऊर्फ राहुलला बीकेसी पोलिसांनी अटक केली. एटीएमचा पासवर्ड मिळवून पैशांसाठी हत्येनंतर मृताचे पाकीट शादाबने चोरले होते. त्यात असलेल्या एटीएम कार्डमधून त्याने पुणे आणि जबलपूर येथे पैसे काढले. एटीएम केंद्रातील सीसीटीव्हीतील चित्रीकरणावरून शादाबला पोलिसांनी बिहारमधून अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मनोजकुमार शिवबच्चन सिंग (32) असे मृताचे नाव आहे. 10 दिवसांपूर्वी त्याची हत्या झाली होती.
Web Title: ATM money crime