एटीएम सुरक्षा रक्षकाला मारहाण करणारे अटकेत

एटीएम सुरक्षा रक्षकाला मारहाण करणारे अटकेत
एटीएम सुरक्षा रक्षकाला मारहाण करणारे अटकेत

नवी मुंबई : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोघा व्यक्तींनी किरकोळ कारणावरून एटीएम सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याची घटना नवीन पनवेलमधील सेक्‍टर-१२ मध्ये घडली. हॅफ्पी सिंग (४०) आणि प्रतीक चायल (३०) अशी या दोघांची नावे असून, खांदेश्वर पोलिसांनी या दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक केली.  

नंदकुमार जाधव (४०) हे पनवेलमधील चिंचवली येथे राहण्यास असून, ते नवीन पनवेल सेक्‍टर-१२ मधील डीएमके जावळी सहकारी बॅंकेच्या एटीएम व बॅंकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. मागील शुक्रवारी सकाळी जाधव हे नेहमीप्रमाणे बॅंकेमध्ये कामावर गेले होते. सायंकाळी बॅंक बंद झाल्यानंतर जाधव एटीएमच्या जबाबदारीवर होते. या वेळी तेथे आलेल्या हॅफ्पी सिंग आणि प्रतीक चायल या दोघांनी एटीएमसमोर मूत्रविसर्जन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जाधव यांनी त्या दोघांना हटकले असता, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या दोघांनी जाधव यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जाधव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com