राऊतच्या घराची पुन्हा झडती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नालासोपारा - स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपारा येथील घराची दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी पुन्हा झडती घेतली. या वेळी वैभवची मोटारही ताब्यात घेण्यात आली. याच मोटारीतून त्याने गावठी बॉम्ब आणि शस्त्रांची वाहतूक केल्याचा संशय एटीएसला आहे. 

वैभवला बुरखा घालून एटीएसचे पथक दुपारी नालासोपाऱ्यात आले होते. त्यांनी दुपारी ३ वाजता वैभवच्या घराची झडती सुरू केली. पावणेचार वाजता ते त्याला घेऊन निघून गेले. त्यांनी गाडीची कागदपत्रे आणि गाडी ताब्यात घेतली. या वेळी चार एअर पिस्तुल, छऱ्यांचे बॉक्स, सीमकार्ड, लॅपटॉप, सीपीयू आदी साहित्यही जप्त करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा दिली. 

समर्थकांची घोषणाबाजी
दरम्यान, वैभवला चौकशीसाठी नालासोपाऱ्यात आणल्याचे समजताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्याच्या घरासमोर गर्दी केली होती. वैभवला परत नेत असताना या कार्यकर्त्यांनी त्याच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: ATS again raided Vaibhav Raut house at Nalasopara