मुंबई : २० रुपयांपायी तीन वर्षाची शिक्षा

चोरीच्या गुन्ह्याची कबुली कारागृहातून पत्राद्वारे न्यायाधिशांना देणाऱ्या आरोपीला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची सजा सुनावली आहे.
Crime
CrimeSakal

मुंबई - चोरीच्या (Theft) गुन्ह्याची (Crime) कबुली कारागृहातून पत्राद्वारे न्यायाधिशांना देणाऱ्या आरोपीला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची (Punishment) सजा सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीने वीस रुपये चोरण्यासाठी गुन्हा केला होता. (Attack for 20 Rupees Theft Three Years Punishment Crime)

२६ वर्षीय आरोपी अर्जुन गायकवाड मागील सात महिन्यांपासून कारागृहात आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात गायकवाड आणि त्याचा साथीदार विनोद गायकवाड यांच्या विरोधात वीस रुपये चोरण्यासाठी तक्रारदाराला मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात भादंवि कलम 394 सह 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये रंगशारदा हौटेल परिसरात रात्रीच्या वेळी एका व्यक्तीकडून पैसे चोरण्यासाठी त्याच्यावर दोघांनी हल्ला केला होता. यामध्ये तक्रारदार जखमी झाला होता. या गुन्ह्यासाठी कायद्यात दहा वर्षे सक्तमजुरीची तरतूद आहे.

Crime
मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपी म्हणजे काय ? करोनाग्रस्तांसाठी नवसंजीवनी

मागील सप्टेंबरपासून आरोपी कारागृहात आहे. चालू वर्षी मार्चमध्ये त्याने न्यायालयात पत्र पाठवून गुन्ह्याची कबुली दिली. महानगर दंडाधिकारी जयदेव घुले यांनी या पत्राची दखल घेतली. आरोपीने स्वतः हून गुन्हा कबूल केला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा सुनावायला हवी. तसेच मागील सात महिने तो कारागृहात आहे. यामुळे त्याचा सहानुभूतीने विचार करायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरीची सजा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com