रुग्णाच्या नातेवाइकाचा वॉर्डबॉयवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुंबई - बेडशीटवरून झालेल्या वादात रुग्णाच्या नातेवाइकाने रमेश पावरा या वॉर्डबॉयवर कात्रीने हल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटे भायखळा येथील रेल्वे रुग्णालयात घडली. पोलिसाने संशयिताला अटक केली असून न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. 15) पोलिस कोठडी दिली.

दत्ता रघुनाथ लोटे याने त्याच्यावर हल्ला केला. सरकारी रुग्णालयांत संतप्त नातेवाइकांकडून डॉक्‍टरांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरता वैद्यकीय शिक्षण विभागाने रुग्णालयात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. तरीही रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ल्याचे प्रकार सुरूच आहेत. भायखळा येथे मध्य रेल्वेचे रुग्णालय आहे. तेथे लोटे याचे नातेवाईक उपचार घेत आहेत. आज पहाटे लोटे याने पावराकडे बेडशीट मागितली. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. रागाच्या भरात लोटेने ड्रेसिंग टेबलवरील कात्रीने पावरावर हल्ला केला.

Web Title: attack in hospital wardboy