घरचे जेवण घेण्यास विरोध केल्याने आरोपींचा पोलिसांवर हल्ला 

घरचे जेवण घेण्यास विरोध केल्याने आरोपींचा पोलिसांवर हल्ला 

ठाणे : नातलगांनी आणलेले घरचे जेवण घेण्यास पोलिसांनी विरोध केल्याच्या रागातून मोक्काखाली तुरुंगात बंदिस्त असलेल्या आरोपींनी पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर बुधवारी दुपारी घडली. दरम्यान, हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करणाऱ्या पोलिस नाईक बळीराम उकिर्डे यांचा मोबाईलही एका कैद्याने फोडला. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी छोटू ऊर्फ बिलाल शमसुद्दीन शेख, राजा ऊर्फ भूषण गणपत मोरे, इमरान ऊर्फ इमू काल्या इब्राहीम सैय्यद, रेहमत युसुफ पठाण, बरकत युसुफ पठाण, अमजद युसुफ पठाण, जाहिद हनीफ शेख, इरशाद समसद्दीन शेख आणि बबन नागेश वाणी आदी नऊ आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करून सर्वांना ठाणे मध्यवर्ती तुरुंगात ठेवले आहे. न्यायालयात सुनावणी असल्याने बुधवारी दुपारी या आरोपींना मोक्का न्यायालयात आणले होते.

सुनावणी 2 वाजता संपल्यानंतर जेवणाची वेळ झाल्याने त्या आरोपींना न्यायालयाबाहेरील रस्त्यावर आणले होते. तेव्हा आरोपींना भेटण्यासाठी आणि जेवण देण्यासाठी नातेवाईक आले; मात्र बुरखाधारी महिलेकडून जेवण देण्यास न्यायालयाची परवानगी नसल्याने पोलिसांनी जेवण देण्यास विरोध केला. त्यामुळे आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व आरोपींना तुरुंगात नेले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुधाकर कदम यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com