क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला

क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला

भिवंडी : भिवंडी शहरालगत असलेल्या चाविंद्रा येथील ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या दोन तरुणांना मंगळवारी सायंकाळी क्षुल्लक वादातून तीन ते चार जणांच्या टोळक्‍याने बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणास अटक करण्यात आलेली नाही. राजकीय दबावामुळे हा प्रकार गुंडाळला जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजप आमदार महेश चौघुले यांनी याप्रकरणी तातडीने आरोपींना अटक करण्याबाबतीत चर्चा केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

विनिकेत मोरे असे गंभीर जखमी युवकाचे नाव असून, तो शहरातील ब्राह्मण आळीतील संकेत वल्लाळ यांच्यासह मंगळवारी सायंकाळी ढाब्यावर जेवणासाठी जात होता. दरम्यान, लघुशंकेसाठी नाशिक रोडवरील अपना वजनकाटा येथे दोघे जण थांबले असता, त्या ठिकाणी तीन ते चार जणांचे टोळके आले. त्यांनी वाद घालत दोघांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यापैकी विनिकेत मोरे हा जमिनीवर पडल्याचे पाहून एकाने मोठ-मोठे दगड उचलून विनिकेतच्या डोक्‍यावर व हातापायावर हल्ला केला. या हल्ल्यात विनिकेत जागीच बेशुद्ध झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले.

या घटनेबाबत पोलिसांना सुमारे दोन तास काही माहिती नव्हती. या मारहाणीचा सर्व प्रकार सीसी टीव्हीत कैद झाला आहे. त्याआधारे तालुका पोलिस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाविंद्रा चौकी काही वर्षांपासून बंद असल्याने या भागातील घडामोडींवर पोलिसांचे लक्ष नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com