Mumbai |"पोलिसांवर हात उगारणं म्हणजे.."; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raigad Police
"पोलिसांवर हात उगारणं म्हणजे.."; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

"पोलिसांवर हात उगारणं म्हणजे.."; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पोलिसांवर होणारे हल्ले हे कायदा सुव्यवस्थेवर झालेल्या हल्ल्यासारखे आहेत, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. पोलिसांवर हाल उचलणं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या कानशिलात लगावण्यासारखं आहे, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.

हेही वाचा: आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन पोलीस कर्मचारी जखमी

२०११ साली सायन रेल्वे स्टेशनजवळ सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी दोन पोलीस गेले असता आरोपीने पोलिसांवर हात उगारलं, त्यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी अनिल घोलप याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या १० वर्षांपासून ही सुनावणी सुरू होती. आता अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

हेही वाचा: पोलिसांवर हल्ला करणाऱ्यास कोठडी

यावेळी मुंबई सत्र न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत आरोपीला चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि ११ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title: Attacking On Police Is Like Attacking Law And Order Mumbai Sessions Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top