माहेरी आणण्यास गेलेल्या पतीला पाजले विष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

रेवदंडा - माहेरी गेलेल्या पत्नीला घरी आणण्यास गेलेल्या पतीला पाण्यामधून विष पाजल्याचा प्रकार सुरईमध्ये घडला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूड-जंजिरा तालुक्‍यातील कोरलईमधील श्रावण वाघमारे हा पत्नी यशोदाच्या माहेरी सुरईला गेला होता. या दोघांमध्ये मागील तीन वर्षांपासून वाद सुरू आहेत. तसेच घटस्फोटाचा खटलाही सुरू आहे. श्रावणने आपल्यातील वाद मिटवून पुन्हा संसार सुरू करण्याची विनंती तिला केली; परंतु यशोदाने त्याला विष मिसळलेले पाणी प्यायला दिले. ते पाणी पिल्याने श्रावणला विषबाधा झाली. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी श्रावण याने यशोदाविरोधात रेवदंडा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. यशोदाला अद्याप अटक करण्यात आली नसून सहायक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील पुढील तपास करत आहेत.

Web Title: Attempt of husbunds murder

टॅग्स