मुंबईत प्रियकराकडून प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

दिल्लीनंतर मुंबईतही तरुणाने एका तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. दहिसर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

Mumbai Crime : मुंबईत प्रियकराकडून प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न

मुंबई - दिल्लीनंतर मुंबईतही तरुणाने एका तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. दहिसर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अमेय दरेकर असून पिडीत तरूणीचे नाव प्रियांगी सिंग असे आहे. आरोपीला मुंबईतील न्यायालयाने सध्या पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने आपल्या मैत्रिणीला पाण्याच्या टाकीवरून 18 फूट खाली ढकलून दिले. सदर घटनेत पिडीत मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेच्या वेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे. पिडीत मुलगी मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि पिडीत मुलगी दोघांची एकमेकांशी सुमारे 10 वर्षांपासून ओळख असून ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले आणि भांडणाचे रूपांतर हाणामारीत होत मुलीला मुलाने मुलीला टाकीवरून ढकलले. सध्या दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

'दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 नोव्हेंबर रोजी एका मुलीसोबत अत्याचाराची घटना उघडकीस आली होती, दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो दहिसर पोलिसांकडे वर्ग केला. दहिसर पोलिसांकडे गुन्हा दाखल केल्यानंतर खुनाचा प्रयत्न, आरोपी तरुणाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.'

- स्मिता पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 12, मुंबई पोलीस