औषधी कचरा जाळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

कल्याण : डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्याकडेला कचऱ्यात औषधे जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. आधीच प्रदूषित सांडपाण्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्‍यात आले आहे.

डोंबिवली एमआयडीसीमध्ये प्रदूषित सांडपाणी नाल्यात सोडल्याने दुर्गंधीयुक्त वासाने नागरिक त्रस्त असताना, आता खंबाळपाडा रोडवर साठलेल्या कचऱ्यात लहान मुलांची औषधे कचऱ्यात जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे असे बेकायदा कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.

 पालिका हद्दीतील रुग्णालय आणि छोटे दवाखान्यांमधील औषध कचरा खासगी संस्थेमार्फत जमा केला जातो. त्यामुळे रस्त्यावर असा कचरा टाकणे बेकायदा असून याबाबत पाहणी चौकशी करून कारवाई करू, अशी माहिती घनकचरा विभाग सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempts to burn medicinal waste