esakal | व्यापारी उपयोगासाठीच आरेची जागा वापरण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसचा फडणवीसांवर गंभीर आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी उपयोगासाठीच आरेची जागा वापरण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसचा फडणवीसांवर गंभीर आरोप

भाजप सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव मुद्दाम बारगळू दिला व कार डेपो आरेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राज्य कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला

व्यापारी उपयोगासाठीच आरेची जागा वापरण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसचा फडणवीसांवर गंभीर आरोप

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई ः आरेच्या जागेचा व्यापारी वापर करता यावा म्हणून तत्कालीन भाजप सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव मुद्दाम बारगळू दिला व कार डेपो आरेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राज्य कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला. 2016 मध्ये वॉररूम चर्चेत आरेच्या 30 एकर जागेचे आरक्षण कार डेपो व अनुषंगिक कार्य, असे करावे आणि भविष्यात अनुषंगिक कार्याचे स्पष्टीकरण वाणिज्यिक कार्य म्हणजे कमर्शिअल ऍक्‍टिव्हिटी असे करण्यास सांगण्यात आले होते, असाही आरोप त्यांनी केला. 

अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचे राज्य सरकारकडून समर्थन

महत्त्वाची बाब म्हणजे आरेच्या 20 हेक्‍टरमध्ये कारशेड करण्याऐवजी 62 हेक्‍टर जागा निश्‍चित करून उरलेली 42 हेक्‍टर जागा व्यावसायिक कामासाठी वापरण्याचेही ठरवण्यात आले होते. कांजूरची जागा मिळाली नाही तर आरे जंगल वाचवण्यासाठी 21 हेक्‍टरवरच प्रकल्प राबवावा, अशी शिफारस तांत्रिक समितीने केली होती. भाजप सरकारने एकीकडे आरेमध्ये 25 हेक्‍टरमध्येच मेट्रो प्रकल्प राबवला जाईल असे म्हटले, पण त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यासाठी 61 हेक्‍टर जागेचा वापर केला जाईल, असे म्हटले होते. ही 40 हेक्‍टर जास्त जागा का घेण्यात आली याचे उत्तर द्यावे, असेही सावंत यांनी म्हटले आहे. 

अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला; उच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

कांजूरमार्गच्या जागेवर खासगी मालकाचा दावा असल्याचे तत्कालीन भाजप सरकारचे म्हणणे चुकीचे आहे. कारण सरकारनेच सादर केलेल्या सी. ए. क्र. 2521-2015 मध्ये सुरेश बाफना या खासगी दावेदारानेच ही 101 एकर जागा सरकारची असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकारने तो अर्ज मागे घेतला. या जमिनीसाठी खासगी मालकाला किती मोबदला देणार हे याच अर्जात उच्च न्यायालयाने विचारले होते. तोच अर्ज मागे घेतल्याने आता मोबदला देण्याचा प्रश्‍नच नाही हे सरकारला ठाऊक होते. तरीही या जमिनीपोटी खासगी व्यक्तीला पाच हजार कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागेल असा घोष भाजप नेते आतापर्यंत करत होते असेही सावंत म्हणाले. 

नॉन कोव्हिड खाटांसाठी टास्क फोर्सची शिफारस; खासगी रुग्णालयांचा फॉर्म्युला 60:40 वर आणण्याचा सल्ला

काम सुरू झाले तरी दावेदार नाही! 
मेट्रो 6 च्या आराखड्यात कांजूरमार्ग येथेच मेट्रो 6 चा डेपो दाखवला आहे. आता महिनाभरापासून येथे काम सुरू झाले असताना कोणीही खासगी जमीनमालक पुढे आला नाही वा कोणालाही नुकसानभरपाई द्यावी लागली नाही. यावरूनच भाजपचा खोटारडेपणा उघड होतो, असाही दावा सचिन सावंत यांनी केला आहे. 

Attempts to use array land for commercial use only

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image