कोविड रुग्णांमध्ये घट ; जुलै महिन्याच्या तुलनेत संसर्ग कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona virus

कोविड रुग्णांमध्ये घट ; जुलै महिन्याच्या तुलनेत संसर्ग कमी

मुंबई: ऑगस्ट महिन्यात (augast month) मुंबईकरांना दिलासादायक बाब समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात कोविड रुग्णांमध्ये (corona patient) 41% घट झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  शुक्रवारी 1 ते 20 ऑगस्टपर्यंत मुंबईत एकूण 5,832 कोविड बाधित (corona patient) रुग्णांची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यात याच कालावधीत 9,339 कोरोना बाधिताची नोंद झाली. तसेच जून महिन्यातील 19 दिवसांत 13,978 एवढे कोरोना बाधित आढळले होते. म्हणजेच संसर्गित होण्याचे प्रमाण हळूहळू (less corona patient infected) कमी होत असल्याची दिलासादायी बाब समोर येत आहे.

हेही वाचा: नीरव मोदींच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची परवानगी मिळाली; PNB बॅंकेला दिलासा

या आकडेवारीच्या नोंदीवर कोविड टास्क फर्स्ट सदस्यांनी समाधान व्यक्त केले असून दुसरी लाट शेवटच्या टप्प्यात असल्याचे मत व्यक्त केले आहे.  त्याच सोबत मुंबईतील एकूण सक्रिय रूग्ण देखील घटले असून ही संख्या 2,853 एवढी आहे. तर, रुग्णालयातील कोविड बेड रिकामे होत असून एकूण 15,907 कोविड खाटांपैकी 87% खाटा रिक्त असल्याची माहिती पालिकेकडून समजत आहे. हे घट होण्याचे प्रमाण सर्व पातळ्यांवर सुरु असून मुंबईतील रोजचा पॉझिटिव्हिटी दर देखील घटत आहे.

Web Title: August Month Corona Patient Less Corona Patient Infected

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..