औरंगाबाद दंगलीत पोलिसांची बघ्याची भूमिका - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - औरंगाबाद दंगलीमध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि काही पक्षाचे नेते, पुढारी या दंगलीचे पुढे होऊन नेतृत्व करत होते, असेदेखील मला सांगण्यात आले. त्यामुळे एकंदरीतच प्रकार बघितला तर सरकारने या दंगलखोरांना नियंत्रित करण्याचा कोणताही पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केला नाही. दंगलीवर नियंत्रण आणण्याचे पोलिसांचे प्रयत्न फारच अपुरे होते, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केला. ते पक्ष कार्यालयात मीडियाशी बोलत होते. एकंदरीतच यामध्ये सरकारला दंगली व्हाव्यात, असे वाटते की काय किंवा अशाप्रकारच्या दंगली झाल्या तरच आपल्याला राजकीयदृष्ट्या श्रेय मिळेल अशी समजणारी मानसिकता आहे की काय, अशी शंकाही जयंत पाटील यांनी उपस्थित केली.
Web Title: Aurangabad Riot Polce Watching Jayant Patil