बेशिस्त रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांना दिली धडक

रविंद्र खरात 
सोमवार, 2 एप्रिल 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात वाहतूक पोलीस आणि कल्याण आरटीओच्या विशेष पथकामार्फत कारवाई सुरू आहे. यामुळे बेशिस्त रिक्षा चालकाचे धाबे दणाणले असून कारवाईच्या वेळात हे रिक्षा चालक गायब असतात. दरम्यान डोंबिवली पश्चिममध्ये महात्मा फुले रोडवर रविवारी (ता. 1) सायंकाळी सात वाजता वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू होती.

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात बेशिस्त रिक्षा चालकाविरोधात वाहतूक पोलीस आणि कल्याण आरटीओच्या विशेष पथकामार्फत कारवाई सुरू आहे. यामुळे बेशिस्त रिक्षा चालकाचे धाबे दणाणले असून कारवाईच्या वेळात हे रिक्षा चालक गायब असतात. दरम्यान डोंबिवली पश्चिममध्ये महात्मा फुले रोडवर रविवारी (ता. 1) सायंकाळी सात वाजता वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू होती. या कालावधीत वाहतूक पोलीस शिपाई संतोष ठाकूर यांनी रिक्षा चालक प्रथम भोईर (वय 17, रिक्षा क्रमांक - एम एच 05- डी क्यू 1814 ) याला रिक्षा चालकाला रिक्षा थांबविण्याचा इशारा दिला, मात्र कारवाईच्या भितीपोटी त्या रिक्षा चालकाने वाहतूक पोलीस शिपाई संतोष ठाकूर धडक मारली यात पोलीस शिपाई ठाकूर यांच्या डाव्या हाताच्या मनगटावरून रिक्षा चालवून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतले, या घटनेत पोलीस शिपाई संतोष ठाकूर जखमी झाले आहेत. 

बेशिस्त आणि मुजोर प्रथम भोईर रिक्षा चालकाला वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेऊन विष्णूनगर पोलीसाकडे देण्यात आले असून विष्णूनगर पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिली.

वारंवार प्रवासी वर्गासोबत हुज्जत , वाढीव भाडे घेणे , प्रवासी नाकारणे , आदी प्रकार वाढत असताना वाहतूक पोलिसावर हल्ले होत असताना रिक्षा चालकांची दादागिरी वाढली असून याला वाहतूक पोलीस आणि आरटीओ कशी चाप लावते याकडे लक्ष लागले आहे. 

रिक्षा चालकांनी सौजन्याने वागावे हे नेहमी सांगतो, डोंबिवली मधील वाहतूक पोलिसाला धडक देऊन जखमी प्रकरणात संबाधित रिक्षा चालकाच्या परवाना वर कारवाई करू अशी माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली. 

घटनेची दखल घेतली आहे, मुजोर रिक्षा चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून गुन्हा ही दाखल केला आहे, रिक्षा चालकांनी कायदा हातात घेऊ नये, दादागिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, बेशिस्त रिक्षा चालकावरील कारवाई पुढे ही सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिली. 

Web Title: auto driver dash to traffic police