बजेटमधील कार तुम्हीच ठरवा कोणती भारी! 

file
file

मुंबई : ह्युंदाई मोटर इंडियाने ग्राहकांच्या आवडत्या ग्रॅण्ड आय टेन निओसला अधिक दमदार केले असून, तीचे स्पोर्ट मॉडेल बाजारात दाखल केले आहे. या मॉडेलची एक्‍स शोरूम किंमत 7 लाख 68 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही कार बीएस 6 मानकांच्या इंजिनसह दाखल करण्यात आली आहे. ती 998 सीसी इंजिनसह , 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे इंजिन 98.6 एचपी पॉवर आणि 171.6 एनएमचा टॉर्क निर्माण करते. यामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्‍सही देण्यात आला आहे. निओस स्पोर्टससाठी 20.3 किमी प्रती लिटरचे मायलेज असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रॅण्ड आय टेन निओसची स्पर्धा ज्या कारशी होणार आहे, त्यामध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट ही प्रमुख आहे. या दोन्ही कार 9 लाख रुपये किमतीच्या आतमध्ये एकमेकांना कशा टक्‍कर देतात ते पाहू.... 

किंमत 
ह्युंदाई ग्रॅण्ड आय टेन निओसची सध्याची दिल्लीतील एक्‍स शोरूम किंमत 5 लाख रुपयांपासून सुरू होत 8 लाख रुपयांपर्यंत आहे. तर मारुती सुझुकी स्विफ्टची एक्‍स शोरूम किंमत दिल्लीमध्ये 5.19 लाख रुपयांपासून 8.84 लाख रुपयांपर्यंत आहे. 

इंजिन 
ग्रॅण्ड आय टेन निओस पेट्रोल आणि डिझेल या दोनीही पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोल इंजिन 1 हजार 197 सीसी, 4 सिलिंडर, 1.2 लीटर कप्पा युनिट आहे. यामध्ये 83 पीएस पॉवर आणि 112 एनएम टॉर्क निर्माण होतो. डिझेल इंजिन 1186 सीसी, 1.2 लीटर, 3 सिलिंडर, यू 2 युनीट आहे. ते 75 पीएस पॉवर आणि 190 एनएमचा टॉर्क निर्माण करते. दोनी इंजिनच्या पर्यायांसह 5 स्पीड मॅन्युअल व ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्यायही यात देण्यात आला आहे. ग्रॅण्ड आय टेन निओसचे पेट्रोल इंजिन 20.7 किलोमीटर प्रती लीटरचे मायलेज तर डिझेल इंजिन 26.2 किलोमीटर प्रती लीटर मायलेज देते. 


याचवेळी मारुती सुझुकीच्या स्विफ्टमध्येही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनचे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र एप्रिलपासून बीएस 6 मानके लागू झाल्यानंतर ही कार केवळ पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असणार आहे. सध्या स्विफ्टचे पेट्रोल इंजिन 1197 सीसी, 1.2 लीटर व्हीव्हीटी, 4 सिलिंडर बीएस 6 युनिट आहे. ती 81 एचपीची अधिकतम पॉवर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क तयार करते. आणि मायलेज 21.21 किलोमीटर प्रती लीटर देते. सोबत 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. स्विफ्टचे डिझेल इंजिन 1248 सीसी, 1.3 लीटर डीडीआयएस 190,, 4 सिलिंडर बीएसय 4 युनिट आहे. ही कार 74 एचपी पॉवर आणि 190 एनएमचा टॉर्क तयार करते. डिझेल इंजिनच्या कारचे मायलेज 28.40 किमी/लीटर आहे. 

सुरक्षा वैशिष्ट्ये 
ह्युंदाई ग्रॅण्ड आय टेन निओसमध्ये ईबीडीसह एबीएस, ड्‌युअल एअरबॅग्स, सेगमेंट फर्स्ट इमरजन्सी स्टॉप सिग्नल, रिअर पार्किंग सेन्सर्स, रिअर कॅमेरा डिस्प्ले, ड्राइवर एंड पैसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर, हाई स्पीड अलर्ट सिस्टम, स्पीड सेंसिंग डोर लॉक या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. 


मारुती स्विफ्टमध्ये समोरील ड्युअल एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, चाइल्ड सीट रिस्ट्रेंट सिस्टीमसह इसोफिक्‍स, रिव्हर्स पार्किंग सेंसर्ससह कॅमेरा, इंजिन इमोबिलायझर, सीट बेल्ट रिमाईंडर, पेडस्ट्रेन, प्रोटेक्‍शन कंप्लायंन्स, ब्रेक असिस्ट, हाय स्पीड अलर्ट सिस्टीमसारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. 

बाह्यरचना 
ग्रॅण्ड आय टेन निओस एलईडी डेटाईम रनिंग लाइट्‌स, रिफ्रेशिंग स्टाइलिंगससह शार्पर फ्रंट लुक, सिल्वर सराउंडेड ग्लॉसी ब्लैक रेडिएटर ग्रिल, प्रोजेक्‍टर यूनिट्‌स देण्यात आले आहेत. सोबत रिप्रोफाइल्ड हैडलैंप्स, ऑल न्यू एलईडी टेल लैंप्स, रियर स्किड प्लेट्‌स, न्यू रियर बंपर, रूफ रेल्स देण्यात आल्यामुळे निओस आकर्षक दिसण्यास मदत होते. 
स्विफ्टमध्ये एलईडी रिअर कॉम्बिनेशन लॅम्प, एलईडी हाई माउंटेड स्टॉप लैंप, रूफ एंटीना, एग्रेसिव फ्रंट ग्रिल, डीआरएलसोबत एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्पसारखी फिचर्स देण्यात आली आहेत. 

अंतर्गत फिचर्स 
ग्रॅण्ड आय टेन निओसमध्ये ब्लूटूथ कनेक्‍टिविटी (Hyundai Blue, Apple CarPlay, Android Auto) सह 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. वॉइस रिकग्निशन, 13.46 सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्‍लस्टर, पावर आउटलेटसह रियर एसी वेंट, ऑटोमेटिक क्‍लाइमेट कंट्रोल, स्टीयरिंग माउंटेड ऑडियो कंट्रोल, इलेक्‍ट्रिकली एडजस्टेबल ओआरव्हीएमएस, लेदर रैप्ड स्टीयरिंग व्हील, कीलेस एंट्री, पुश बटन स्टार्ट/स्टॉप देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये इलेक्‍ट्रिक पावर टिल्ट स्टियरिंग, पावर विंडोजही देण्यात आल्या आहेत.


मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये गियर शिफ्ट इंडीकेटर, पावर एंड टिल्ट स्टीयरिंग, मैनुअली एडजस्टेबल ओआरवीएम्स, मल्टी इनफॉरमेशन डिस्प्ले, स्टींग माउंटेड ऑडियो कंट्रोल्स, ऑटो गियर शिफ्ट, पुश स्टार्ट स्टॉप बटन, ऑटोमेटिक क्‍लाइमेट कंट्रोल, स्मार्ट की, एप्पल कारप्ले और एंड्रॉयड ऑटोला सपोर्ट करणारी स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम या सारख्या फिचर्सचा समावेश आहे. 


वरील वैशिष्यांच्या मदतीने तुम्ही ग्रॅण्ड आय टेन निओस घ्यावी की मारुती सुझुकी स्विफ्ट याचा विचार केला असेलच. कारविषयी आणखी माहिती हवी असेल तर प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com