पश्‍चिम रेल्वेच्या लोकलला स्वयंचलित दरवाजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई - लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग पश्‍चिम रेल्वेने पुन्हा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात लोकलमधील महिला डब्यांना दरवाजे बसवण्यात येणार आहेत. यापूर्वी चर्चगेट-बोरिवली लोकलच्या प्रथम श्रेणीच्या महिला डब्यात स्वयंचलित दरवाजे बसवले होते. तांत्रिक अडथळ्यानंतर हा प्रयोग बंद केला होता.

दिल्ली मेट्रोचा अभ्यास करून स्वयंचलित दरवाजाची यंत्रणा पश्‍चिम रेल्वेने सिमेन्स लोकलमध्ये बसवली. त्या प्रयोगात स्वयंचलित दरवाजाचे नियंत्रण हे गार्डच्या हातात दिले होते. त्यासाठी गार्डला बरीच कसरत करावी लागत असल्याने हा प्रयोग मागे घेतला. स्वयंचलित दरवाजा बसण्यासाठी वेगळे नियोजन करण्याचा निर्णय घेत एका लोकलमध्ये 20 स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम सुरू आहे. त्यात काही महिला डब्यांना तर अन्य दरवाजे हे सर्वसाधारण डब्यांनाही बसवण्यात येतील. या कामाला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीमध्ये स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल धावेल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

Web Title: Automatic doors of the Western Railway train