भाईंदर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने रिक्षाचालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाने रिक्षेला पाठीमागून धडक दिल्यामुळे रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भाईंदर येथे घडली आहे.
Rickshaw Accident
Rickshaw AccidentSakal
Summary

अज्ञात वाहनाने रिक्षेला पाठीमागून धडक दिल्यामुळे रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भाईंदर येथे घडली आहे.

भाईंदर - अज्ञात वाहनाने रिक्षेला (Rickshaw) पाठीमागून धडक (Dash) दिल्यामुळे रिक्षाचालकाचा (Driver) जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना भाईंदर येथे घडली आहे. गोल्डन नेस्ट ते काशीमिरा या मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास गोल्डन नेस्ट सर्कल पासून थोड्या अंतरावर ही घटना घडली. काशिमीराच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला एका अज्ञात वाहनाची पाठीमागून धडक बसल्याने रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे रिक्षा उलटून रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला.

रिक्षा चालकाचे नाव शहनशहा शकील अहमद खान (वय 24) असे असून तो गोल्डन नेस्ट भागातील आझाद नगर येथे रहात होता. या घटनेची माहिती नवघर पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. पोलीसांनी धड़क दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com