मुंबईत रिक्षाचालकाने केले युवतीसमोर हस्तमैथुन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

एका रिक्षाचालकाने युवतीसमोर हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबईः एका रिक्षाचालकाने युवतीसमोर हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, युवतीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मुंबईमधील लिंक रोड परिसरात 1 सप्टेंबर रोजी ही प्रकार घडला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वीस वर्षीय युवती 1 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास लिंक रोडवरील चिंचोली बंदर परिसरातील बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. यावेळी मोहम्मद शकील अब्दुल कादर मेमन या रिक्षाचालकाने युवतीसमोर येऊन रिक्षा थांबवली व बसण्यास सांगितले. मात्र, युवतीने बसने जाणार असल्याचे सांगितले. मात्र, रिक्षाचालक खाली उतरला व त्याने अश्लील चाळे सुरू केले. युवतीने आईला फोन करुन याबाबत सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने अश्लील चाळे सुरुच ठेवले. काही वेळानंतर त्याने युवतीसमोर हस्तमैथून सुरू केले. रिक्षाचालकाचे अश्लिलचाळे पाहून युवतीने आरडाओरड सुरु केली. त्यामुळे रिक्षाचालकाने रिक्षा तिथेच ठेऊन पळ काढला.

दरम्यान, युवतीने आपल्या आईच्या मदतीने गोरेगाव पश्चिममधील बांगूर नगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांना बस्तीस वर्षीय रिक्षाचालकाची माहिती मिळाली असून त्याला अटक करण्यात आली आहे. संबंधित रिक्षाचालकाने यापूर्वीही असे प्रकार केल्याची कबुली तपासादरम्यान पोलिसांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: autorickshaw driver masturbating front girl at mumbai