Tiger
Tiger

बेशुद्ध करण्याची प्रक्रिया चुकली

मुंबई - ‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करण्याची पद्धत चुकली असून, बेशुद्धीसाठी दिलेले इंजेक्‍शन (डार्टिंग) तिच्या स्नायूंमध्ये गेलेच नव्हते, अशी माहिती तिच्या शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. हा अहवाल ‘सकाळ’च्या हाती लागला असून, त्याबाबत वन विभागाकडून मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

प्राण्याला दिवसा पकडायचे असल्यास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने त्याला बेशुद्ध करण्याचे नियम लागू केले आहेत. रात्री प्राण्याला बेशुद्ध केले तर अंधारात स्नायूंपर्यंत इंजेक्‍शन पोचत नाही, त्यामुळे रात्री प्राण्याला बेशुद्ध करण्यास प्राधिकरणाने बंदी घातली आहे. ‘अवनी’च्या शरीराच्या बाहेरच्या भागांतच इंजेक्‍शन पोचले.

हे डार्टिंगही ‘अवनी’ला जवळून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे, त्यामुळे शिकारी असगर अली याने व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा नियम मोडल्याचे समोर आले आहे. खूप दिवस अन्न न मिळाल्याने ही वाघीण अशक्त झाली होती, अशी माहितीही या अहवालात दिली आहे. 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थापन केलेल्या समितीकडून ‘अवनी’संदर्भात स्थायी कार्यप्रणाली प्रक्रिया (एसओपी) पाळली गेली का, याचा शोध घेतला जाणार आहे. मात्र, ‘अवनी’ रात्री दिसल्याने तिला डार्टिंग करणे; तसेच तिला बेशुद्ध करण्याची प्रक्रियाही चुकीची करणे अशा दोन्ही नियमांचे उल्लंघन शिकारी असगर अली याने केले आहे. या सर्व प्रकरणाबाबत मुनगंटीवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी प्राणिमित्र आनंद सिवा यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com