मुंबईतील फायर ऑडिटची माहिती देण्यास टाळाटाळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईत आगीच्या घटनांत वाढ होत आहे. अग्निशमन दलाकडे फायर ऑडिटबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती मागवली होती; मात्र ती देण्यास नकार देण्यात आला. 

मुंबई - मुंबईत आगीच्या घटनांत वाढ होत आहे. अग्निशमन दलाकडे फायर ऑडिटबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती मागवली होती; मात्र ती देण्यास नकार देण्यात आला. 

गलगली यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मुंबई पालिकेच्या हद्दीत फायर ऑडिटअंतर्गत असलेल्या इमारतींची संख्या, इमारतीचा प्रकार, वॉर्डाचे नाव, एकूण फायर ऑडिट केलेल्या इमारतींची संख्या आणि फायर ऑडिट न झालेल्या इमारतींची संख्या मागितली होती. यावर विभागीय अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत यांनी कळवले की, महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अन्वये इमारतींचे मालक/भोगवटादार/हौसिंग सोसायटी यांनी त्यांच्या इमारतीचे फायर ऑडिट परवानाधारक अग्निशमन यंत्रणेमार्फत करून घेणे गरजेचे असते. मात्र, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही माहिती देण्यास सावंत यांनी नकार दिल्याचे गलगली यांनी कळवले आहे. 

Web Title: Avoid sending information about fire audit in Mumbai