सॅनिटरी पॅडच्या कचऱ्यासाठी जागृती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - महिलांकडून वापरलेले सॅनिटरी नॅपकिन ओल्या वा सुक्‍या कचऱ्यात फेकले जातात. त्याचे वर्गीकरण करताना पालिकेच्या सफाई कामगारांना त्रास होतो. त्यामुळे वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट जैविक कचरा म्हणून करावी अशी मागणी होत आहे. नॅपकिनचा कचरा कुठे आणि कसा टाकावा, याबाबत पालिका आता महिलांमध्ये जागृती करणार आहे. 

महिलांनी वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनची वेगळी अशी विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने सॅनिटरी नॅपकिन ओल्या वा सुक्‍या कचऱ्यात टाकण्यात येतात. कचऱ्यात टाकलेले नॅपकिन्सचे वर्गीकरण पालिका कर्मचाऱ्यांना करावे लागते. असे वर्गीकरण करताना त्रास सहन करावा लागत असल्याच्या पालिका कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने घन कचरा व्यवस्थापन नियमामधील तरतुदींप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या कंपनीने नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य प्रकारे पाकिटे पुरवणे बंधनकारक केले आहे. मात्र, याची महिलांना माहिती नाही. त्यामुळे घन कचरा व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदीनुसार सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

वापरलेले सॅनिटरी नॅपकिन कंपनीकडून पुरवलेल्या पाकिटांमध्ये गुंडाळून अविघटनशील म्हणजेच पुनर्वापर होणाऱ्या सुक्‍या कचऱ्यामध्ये टाकण्यासाठी महिलांना जाहिराती व प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाणार आहे.

नॅपकीनसोबत देणार बॉक्‍स
सॅनिटरी नॅपकीनच्या पुरवठादार कंपन्यांना नॅपकीनसोबत बॉक्‍स देणे पालिका बंधनकारक करणार आहे. वापरलेले सॅनिटरी पॅड बॉक्‍समध्ये टाकून तो बॉक्‍स सुक्या कचऱ्यात टाकावा. जेणेकरून तो नष्ट करणे सोपे जाईल. सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्रसार माध्यमांमधून जाहिराती करण्यात येणार आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रमांतून जनजागृती केली जाईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Awareness for Sanitary Pad Waste

टॅग्स