जिल्हा रुग्णालयात बालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

अलिबाग : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री एका सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुलगा दगावल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. अलमिर इस्तियाक रोगे (चावडी मोहल्ला, अलिबाग) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.

अलमिरला उलटीचा त्रास झाला होता. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. बाल रुग्ण कक्ष विभागात त्याला उपचारासाठी दाखल केले; परंतु अधिक उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्‍टरांनी घोषित केले.

डॉक्‍टरांच्या संपाचा फटका
जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरगुरुवारपासून संपावर गेले आहेत. डॉक्‍टर वेळेवर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a baby killed in District hospital