जिवाणू रोखणार तेलगळतीचे दुष्परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - समुद्रात मालवाहू जहाजांची दुर्घटना झाल्यानंतर होणाऱ्या तेलगळतीमुळे जलप्रदूषण होतेच; शिवाय हजारो समुद्री जीव मृत्युमुखी पडतात. या तेलगळतीमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासासाठी "डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन'ने (डीआरडीओ) "बायोमिक्‍स' आणि "न्यूट्रिमिक्‍स' या दोन जिवाणूंचा शोध लावला आहे. हे जिवाणू समुद्रात सोडल्यास ते तेल काही तासांतच नष्ट करून टाकतात. त्यामुळे हजारो समुद्री जीव वाचण्यास मदत होणार आहे.

तेलगळतीमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी नौदलाकडून काही रसायने वापरली जात; मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. या पार्श्‍वभूमीवर या जिवाणूंचा शोध लावण्यात आला आहे. अलीकडेच समुद्रात 100 मीटर अंतरावर साचलेले तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी हे जिवाणू असलेले 10 लिटर द्रव्य वापरण्यात आले. काही तासांतच या जिवाणूंनी ते तेल पूर्णपणे नष्ट केले. आगामी काळात देशात कुठेही तेलगळती झाल्यास समुद्रातील तेलाचे तवंग नष्ट करण्यासाठी या जिवाणूंचा वापर करण्यात येईल, अशी माहिती "डीआरडीओ'चे अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी दिली.

Web Title: Bacteria Oil Leakage Sea DRDO

टॅग्स