दिवेआगरमध्ये रस्त्यांची चाळण

श्रीवर्धन : दिवेआगार येथील रस्त्यांवर पडलेले खड्डे.
श्रीवर्धन : दिवेआगार येथील रस्त्यांवर पडलेले खड्डे.

श्रीवर्धन (बातमीदार) : अथांग समुद्रकिनारा, नारळी फोफळीच्या बागा, मासे खाणाऱ्यांसाठी पर्वणीचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन तालुक्‍यातील दिवेआगर येथील रस्त्याचे स्वरूप सध्या खड्डेमय झाले आहे. याशिवाय, दिवेआगरमधील मुख्य चौक असलेल्या शिवाजी चौक परिसरातील रस्ते पावसाने वाहून गेले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत.

कोकणातील पर्यटन तालुका म्हणून श्रीवर्धनची ओळख आहे. राज्यभरातून अनेक पर्यटक व भाविक हरिहरेश्वर, दिवेआगर, श्रीवर्धन, तसेच जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत असतात. पावसाळ्यानंतर लगेचच काही दिवसांनी पर्यटकांची लगबग सुरू होते. जवळजवळ ६० ते ७० टक्के नागरिकांचा उदरनिर्वाह येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असतो. येथील रस्त्यांची अशीच अवस्था राहिली, तर नक्कीच पर्यटकांचा ओघ कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हा दिवेआगरमधील खानावळ व पर्यटन निवास चालवणाऱ्या ग्रामस्थांना बसेल. 

दिवेआगरमधील रस्त्याचे खड्डे ग्रामपंचायतीने दोन ते तीन वेळा बुजवले आहेत; परंतु पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा खड्डे पडत आहेत. सहा नवीन डांबरी रस्त्याचे काम मंजूर झाले असून, आचारसंहितेमुळे काम थांबले आहे. 
- उदय बापट, सरपंच, दिवेआगर

दिवेआगर ग्रामपंचायतीने सतत खड्डे न बुजवता कायमस्वरूपी डांबरी रस्ते बनवून ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करावा. 
- कौशल वाणी, शिवसेना शाखाप्रमुख, दिवेआगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com