बदलापूरात भूतदयेचे अनोखे दर्शन, 25 भटक्या श्वानांना घरात आसरा 

बदलापूरात भूतदयेचे अनोखे दर्शन, 25 भटक्या श्वानांना घरात आसरा 

बदलापूर : बदलापूरच्या मांजर्ली भागातील हरी ओम अपार्टमेंटमध्ये आश्‍लेषा कुळकर्णी आणि त्यांची आई अशा दोघी वास्तव्यास आहेत. त्या दोघींनादेखील भटक्या कुत्र्यांचबद्दल अनोख्या प्रकारचे प्रेम आहे. त्याचेच दर्शन त्यांनी जगाला दिले असून आपल्या राहत्या घरात त्यांनी तब्बल 25 भटक्या कुत्र्यांना आसरा दिला आहे. सध्या मात्र इमारतीतील इतर नागरिकांच्या तक्रारीमुळे नगरपरिषदेने त्यांना कुत्र्यांना सोडून देण्यास सांगितले असल्याने आश्लेषा व त्यांची आई या चिंतेत आहेत. 

या सर्वाची सुरूवात झाली ती 2018 मध्ये... कुळकर्णी कुटूंब राहात असलेल्या इमारतीत एका कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिला होता. तेव्हा त्यातील दोन पिल्ले गाडी खाली येऊन मृत्युमुखी पडली, त्यावेळी मुक्‍या जीवांचा बळी गेलेला पाहून आश्‍लेषा कुळकर्णी यांना फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी त्या कुत्रीसह तिच्या इतर तीन पिल्लांना घरी आणले. त्यानंतर त्या सर्वांना आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे त्यांनी सांभाळले. यानंतर आता त्यांची वंशावळ वाढून पंधरावर गेली आहे. तसेच जुलै महिन्यात आलेल्या पुराच्या पाण्यात बुडत असलेल्या 10 कुत्र्यांनादेखील आश्‍लेषा यांनी घरी आणले आणि त्यांचा सांभाळ करणे सुरू केले. असे करत त्यांच्या घरी तब्बल 25 कुत्री वास्तव्यास आली.

कुळकर्णी कुटूंबियाकडून मदतीचे आव्हान

मात्र, मागील काही दिवस कुत्र्यांचा आवाज आणि इमारतीमधील वावर यामुळे इमारतीतील इतर नागरिकांना त्रास होऊ लागला आहे, त्यामुळे त्यांनी बदलापूर नगरपालिकेत तक्रार केल्याने आता नगरपालिकेने अश्‍लेषा यांच्या घरातील सर्व कुत्र्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, घरातील सदस्यांप्रमाणे झालेल्या या श्‍वानांना कुठे सोडणार असा प्रश्‍न कुळकर्णी कुटुंबीयांना पडला असून त्यांनी यासंदर्भात मदतीचे आव्हान केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com