esakal | बदलापूर : सावरकर उड्डाणपुलावर खड्डे
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बदलापूर : सावरकर उड्डाणपुलावर खड्डे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बदलापूर : बदलापूर (Badlapur) पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण (Bridge) पूल. या उहाण पुलाच्या पश्चिमेकडील साईकृपा रुग्णालयाजवळ आणि पूर्वेकडे बदलापूर (Badlapur) पालिकेच्या (Municipal) बाहेरील रस्त्यांची चाळण झाली आहे; मात्र पालिकेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे.

या उड्डापुलाच्या सुरुवातीलाच महापालिकेच्या समोर मोठा खड्डा पडला आहे. या खड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना या खड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यात दुबे रुग्णालयात येणारे रुग्ण, वयोवृद्ध, गर्भवती महिला, अपंग नागरिक यांना या खड्ड्यांमुळे प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. मागील महिन्यातच उड्डाण पुलाच्या व आजूबाजूच्या सगळ्या खड्यांची डागडुजी करण्यात आली होती.

हेही वाचा: पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यांवर खड्डेच खड्डे

क्रॉक्रीटच्या रस्त्यांवर डांबरीकरण करून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पालिकेने खड्डे बुजवले होते, मात्र आठवडाभरसुद्धा ही डागडुजी राहिली नाही आणि या ठिकाणी पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली.

loading image
go to top